Courses

bori-banner-head-bottom-img

परिचय मराठा इतिहासाचा : स्वराज्य ते साम्राज्य

bori-banner-head-bottom-img

परिचय मराठा इतिहासाचा : स्वराज्य ते साम्राज्य

व्याख्यानमालेची माहिती – 

भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, संयुक्त विद्यमाने सहर्ष आयोजित  मराठा इतिहासावरील एक परिचयात्मक online व्याख्यानमाला – “परिचय मराठा इतिहासाचा:  स्वराज्य ते साम्राज्य”. प्रस्तुत व्याख्यानमाले मध्ये भारताची शिवपूर्व काळातील राजकीय स्थिती, स्वराज्याची स्थापना व साम्राज्य विस्तार ह्या मुद्द्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल.

शतकानुशतकांच्या परकीय सत्तेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुल्य शौर्याच्या, अजोड नीतीच्या व अपरिमित श्रमांच्या बळावर स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य- स्थापनेसह हिंदुस्थानच्या तत्कालीन राजकीय, सामाजिक स्थितीला सुयोग्य दिशा दिली.

कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत स्वराज्याच्या वारसदारांनी आणि शिलेदारांनी ही धुरा सांभाळली आणि मराठा स्वराज्य एका सार्वभौम साम्राज्यामध्ये परिवर्तित झाले. स्वराज्य ते साम्राज्याचा हा प्रवास भारतीय इतिहासाचा एक गौरवशाली अध्याय आहे.

“परिचय मराठा इतिहासाचा : स्वराज्य ते साम्राज्य ” या व्याख्यानमालेमध्ये मराठा इतिहासाच्या विविध पैलूंवर संशोधकीय दृष्टिकोनातून चर्चा केली जाईल. प्रस्तुत व्याख्यानमालिकेमध्ये शिवपूर्व काळापासून म्हणजे इ. स. १६०० ते इ. स. १८१८ या कालावधीतील प्रत्येक महत्वाच्या टप्प्याचा ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे अभ्यासपूर्ण आढावा घेतला जाईल.

 

विषय  –

  1. शिवपूर्व भारत
  2. छत्रपती शिवाजी महाराज : स्वराज्य – स्थापना
  3. छत्रपती संभाजी महाराज : मराठ्यांचे स्वातंत्र्य-युद्ध
  4. छत्रपती राजाराम महाराज : मराठ्यांचे स्वातंत्र्य-युद्ध
  5. स्वराज्याची पुनर्बांधणी
  6. श्रीमंत बाजीराव पेशवा (थो.): सार्वभौमत्वाचा प्रारंभ
  7. साम्राज्य-विस्तार व पानिपत
  8. साम्राज्याची पुनर्बांधणी
  9. उत्तरेतील सत्ता-संघर्ष
  10. दक्षिणेतील सत्ता-संघर्ष
  11. साम्राज्याचा अस्त
  12. उपसंहार

 

 

व्याख्यानमालेचे तपशील 

दिनांक – अजून निश्चित नाही.

भाषा – मराठी

वयोमार्यादा – १६ वर्षे आणि अधिक

प्रवेश शुल्क – ९00 रुपये

सहभागींना काय मिळेल?

– वाचन साहित्य

– प्रशास्ति पत्रक

– प्रश्नोत्तरे

संकल्पना – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि भारत इतिहास संशोधक मंडळ

अधिक माहितीसाठी

संपर्क – Digital@boriindia.org

 

About Bhandarkar Oriental Research Institute
Bhandarkar Oriental Research Institute
bori-inner-content-bottom-img