व्याख्यानमालेची माहिती –
१९६६ साली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रसिद्ध करून महाभारताच्या अध्ययनामध्ये भरीव योगदान दिले. महाभारताच्या अभ्यासाची परंपरा भांडारकर संस्थेने आजही जपली आहे व हा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
प्रस्तुत व्याख्यानमालेमध्ये ‘सत्यवती’, ‘गंगा’, ‘गांधारी’, ‘कुन्ती’, ‘माद्री’ आणि ‘द्रौपदी’ या महाभारतातील प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखांवरील व्याख्यानांचा समावेश आहे. भारतीय वाङ्मयाच्या समृद्ध परंपरेतील दोन प्राचीन आर्ष-महाकाव्यांपैकी एक म्हणजे वाल्मीकि-रचित ‘रामायण’ तर दुसरे वेदव्यासकृत ‘महाभारत’. महाभारतातील कौरव-पाण्डव-युद्ध, विविध व्यक्तिरेखा, आदर्श, संघर्ष, नीती, भगवद्गीतेतील उपदेश, आख्याने, उपाख्याने अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे महाभारताचे ग्रांथिक परंपरेमध्ये अढळ स्थान आहे.ह्या व्यक्तिरेखांचे विविध आयाम, महाभारतातील त्यांचे महत्त्व, त्यांच्या कथा, काही प्रसंग असे विविध पैलू ह्या व्याख्यानांमध्ये चर्चिले जातील. भारतीय जनमानसावरील महाभारताच्या प्रभावाचे प्रतिबिंब लोकसाहित्यातही दिसते.
विषय –
१ . योजनगंधा सत्यवती
२. डोळस गंधारी
३. माता कुंती
४. पतिव्रता माद्री
५. भीष्ममाता गंगा
६. लोकदेवता द्रौपदी
७. महाभारताची महानायिका द्रौपदी
दिनांक – अजून निश्चित नाही.
भाषा – मराठी
वयोमार्यादा – १६ वर्षे आणि अधिक
प्रवेश शुल्क – 800 रुपये
संकल्पना – भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर
अधिक माहितीसाठी
संपर्क – Digital@boriindia.org